वीरश्री मालोजीराजेंच्या गढीवरील अतिक्रमण हटवा,इंदापूरात शिवभक्तांचे आमरण उपोषण
आय मिरर
विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा ताजा असतानाच आता पुण्याच्या इंदापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील आणि रामवेस नाका परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी इंदापूर तहसील कार्यालयासमोर शिवभक्तांनी आमरण उपोषण सुरु केले.
इंदापूर नगरी ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची जहागिरी होती. याच भूमीत वीरश्री मालोजीराजे भोसले यांना वीर मरण आले.या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी असून या गढीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हा ऐतिहासिक गढी अतिक्रमण मुक्त व्हावी अशी मागणी पुढे येत असून अद्याप पर्यंत यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शिवभक्त आक्रमक झाले आहेत.ही गढी अतिक्रमाण मुक्त व्हावी आणि हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा यासाठी सोमवारी दि. 5 ऑगस्टपासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर शिवभक्तांनी आमरण उपोषणास सुरु केले आहे.
What's Your Reaction?