ओबीसी आरक्षण रक्षणार्थ इंदापूरात पार पडली बैठक,केल्या या मागण्या 

Nov 12, 2023 - 13:28
 0  448
ओबीसी आरक्षण रक्षणार्थ इंदापूरात पार पडली बैठक,केल्या या मागण्या 

आय मिरर

आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही.जे गरीब आहे त्यांना मिळावे पण मराठा समाजाला सरसकट दाखले देऊन ओबीसीकरण करू नये.अशी मागणी पांडुरंग शिंदे यांनी केली.

इंदापूर शहरातील श्री.संत सावतामाळी मंदिर येथे शनिवारी दि.११ नोव्हेंबर रोजी 'एकच मिशन बचाव ओबीसी आरक्षण' साठी ओबीसी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोपट पवार, बाळासाहेब व्यवहारे, अतुल व्यवहारे, अशोक देवकर,तानाजी धोत्रे, सलीम बागवान, फकीर पठाण, प्रकाश पवार, अप्पा माने, रमेश शिंदे, सुनील शिंदे, राजकुमार राऊत, बलभीम राऊत, अजित शिंदे, सौरभ शिंदे, लक्ष्मण देवकाते, नागेश शिंदे, अमोल पेटकर, यांचेसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना सलीम बागवान म्हणाले, जर आरक्षण कमी झाले तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल तरी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे.अप्पा माने म्हणाले,सद्य स्थितीत आरक्षण आहे.म्हणून संधी मिळतेय नाहीतर संधी मिळत नाही.हे गावोगावी पहायला मिळत आहे.यामुळे जातनिहाय जनगणना करून त्या प्रमाणे आरक्षण द्यावे. तानाजी धोत्रे यांनी घटने नुसारच आरक्षण द्यावे. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसकट समाविष्ट करून नये.अशी मागणी केली. पोपट पवार यांनी बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही जात निहाय जनगणना करून आरक्षण रचना करावी यामुळे कोणत्याच समाज समाजात तेढ निर्माण होणार नाही.असे सांगितले.तर रमेश शिंदे यांनी ओबीसी आरक्षण राज्य घटनेच्या आधारे मिळाले,यामुळे सरसकट आरक्षणाला विरोध आहे.सर्वधिक मुख्यमंत्री, आमदार, कारखाने, शैक्षणिक संस्था, पतसंस्था मराठा समाजाच्या नेत्यांच्या तरीही आरक्षण मागत असल्याचे सांगितले.

एकच पर्व ओबीसी सर्व चा नारा - केंद्र आणि राज्य सरकारने घटनेत दुरुस्ती करून आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण द्यावे.आमचा विरोध नाही मात्र जर ओबीसी मधून आरक्षण दिले तर सरकारला खुर्ची वरून खाली घेतल्याशिवाय राहणार नाही.जे ओबीसीच्या मागे त्यांना समर्थन असेल असे जाहीर करीत जालना येथे छगन भुजबळ यांची सभा व लवकरच इंदापूर मध्ये महामोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन एकच पर्व ओबीसी सर्व चा नारा देण्याची घोषणा करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow