लाकडीच्या सरपंचाने स्पष्टचं सांगितले म्हणाले,मी पक्क्या गुरुचा चेला अन् आमदार भरणेंच्या तालमीतील पट्टा
आय मिरर
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या तालमीतील पट्टा असून गावगाड्यातील काही लोकांनी मला उमेदवारी मिळू दिली नाही त्यामुळे मी वेगळा मार्ग निवडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या सत्काराला अनुपस्थित राहिलो कारण गावातील लोकांचा विचार करून निर्णय घ्यायचा होता. परंतु मी पूर्वी पासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे असे मत लाकडीचे सरपंच कुशाबा रामा भिसे यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील नुकत्याच ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये भाजपच्या वतीने तीन ग्रामपंचायतीवर दावा करण्यात आला तर राष्ट्रवादीच्या वतीने पाच ग्रामपंचायतीवर दावा करण्यात आला. आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला यामध्ये लाकडी गावचे सरपंच कुशाबा रामा भिसे हे अनुपस्थित होते त्यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी लाकडी चे सरपंच आपल्या सोबत असल्याचा दावा केला होता. आज लाकडीचे सरपंच भिसे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची सदस्यांसह काही ग्रामस्थांसोबत भेट घेतली व आपण आमदार भरणे यांच्या सोबत असल्याचे सांगितले.
लाकडी येथे पक्षिय जोडे बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गाव पातळीवर जोरदार प्रयत्न झाले. त्यामध्ये नऊपैकी सात सदस्य बिनविरोध करण्यात यश आले. मात्र, सरपंचपदासाठी एकमत न झाल्याने अखेर पंचरंगी निवडणूक लागली होती यामध्ये भिसे यांनी विजय मिळवला.
What's Your Reaction?