अजितदादांच्या मनात नेमके काय? ९ मंत्र्यांचा लवाजमा घेऊन आज बारामतीत कोणता धमाका करणार?
आय मिरर
बारामतीत आज १४ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा होणार आहे.त्यासाठी अगदी २५ हजार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. बारामतीच्या मिशन हायस्कूल मैदानावर ही सभा होणार आहे.
या मेळाव्यास पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ ,दिलीप वळसे पाटील , हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे अनिल पाटील ,आदिती तटकरे ,धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे यांच्या सह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
या सभेपूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या सभेत मोठा धमाका होणार, असे सांगून सभेला हवा दिली आहे. या सभेला जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ मंत्री आणि अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे अजितदादांच्या मनात नेमके काय आहे,९ मंत्र्यांचा लवाजमा घेऊन आज बारामतीत कोणता धमाका करणार?याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
लोकसभेत निराशाजनक कामगिरी केलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून असा नेमका काय धमाका होणार याची मात्र यानिमित्ताने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.एकूणच लोकसभेच्या निवडणूकीपासून बारामतीकडे न आलेले दादा दोन दिवसांपूर्वी पालखी सोहळ्यात सहभागी झाले, तब्बल सात ते आठ किलोमीटर पायी चालले आणि त्यानंतर पहिल्यांदाच ते जाहीर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत, राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारही पहिल्यांदाच मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत, त्या सर्व पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्वाचा ठरेल असं दिसत आहे.
What's Your Reaction?