बिग ब्रेकिंग | आ.भरणेंच्या नंतर हर्षवर्धन पाटील लक्ष ! सकल मराठा समाजाचा उद्या हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या

Feb 18, 2024 - 15:58
Feb 18, 2024 - 16:08
 0  1238
बिग ब्रेकिंग | आ.भरणेंच्या नंतर हर्षवर्धन पाटील लक्ष ! सकल मराठा समाजाचा उद्या हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या

आय मिरर(देवा राखुंडे) 

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी याठिकाणी चालु केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ पाठींबा म्हणुन इंदापूर तालुका सकल मराठा समाजातील काही बांधवांनी शनिवारी दि.१७ फेब्रुबारी रोजी इंदापूरचे लोकप्रतिनिधी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी निवासस्थाना बाहेर ठिय्या आंदोलन केले.यानंतर आता उद्या सोमवारी दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी सकल मराठा समाजाकडून भाजपचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मधील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण केले जाणार आहे. या संदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियात वायरल होत आहे.

शुक्रवारी दि.१६ रोजी दुपारी सकल मराठा समाजाची इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली असून या बैठकीत लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांनी दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजीच्या होणाऱ्या आधिवेशनामध्ये मराठा आरक्षण संदर्भातील सगेसोयरे संदर्भात कायदा पारीत करण्यासाठी माराठा समाजाच्या समर्थनार्थ आवाज उठवावा यासाठी त्यांच्या अंथुर्णे (भरणेवाडी) येथील निवासस्थानासमोर आणि हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मध्ये निवासस्थानासमोर या आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी आमदार भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवास्थानाबाहेर महादेव सोमवंशी,रोहित उर्फ बंडा पाटील, सोमनाथ दशरथ जाधव आणि पवन घोगरे हे ठिय्या आंदोलनासह आमरण उपोषण केले. यावेळी सकल मराठा समाज बांधव एकवटले होते.

दरम्यान दत्तात्रय भरणे यांनी आपण मराठा समाजाच्या पाठीशी असून मराठा समाजाच्या मागण्या योग्य आहेत. होणाऱ्या विशेष अधिवेशनात सगेसोयरे शब्दाबाबत काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांकडे आपण मागणी करत असल्याचे लेखी पत्र भरणेवाडी येथील आणि कांदलगाव मधील मराठा आंदोलकांना देत आपली भूमिका स्पष्ट केली.

यानंतर सगेसोयरे बाबतचा कायदा पारित करण्यासाठी माजी लोक प्रतिनिधी हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका त्यांच्या पक्षाकडील सर्व आमदारांकडे मांडावी यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाजाकडून सोमवारी ती या आंदोलन आणि आमरण उपोषण केले जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू असून रविवारी 17 फेब्रुवारी रोजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा नववा दिवस आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गेल्या काही महिन्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात गावोगावी आंदोलने उपोषणे झाली. आता मात्र आरक्षणाची लढाई उग्ररूप धारण करताना पाहायला मिळत असून कालपर्यंत जरांगे पाटील यांनी पाण्याचा थेंबही घेतला नव्हता, समाजाने घातलेल्या समजुती नंतर जरांगे पाटील यांनी उपचार घेतले आहेत. आता मात्र मराठा समाजाने थेट आपापल्या तालुक्यात लोकप्रतिनिधींनाच लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारने जर वेळेत निर्णय नाही केला तर आरक्षणाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow