पवार कुटुंब एकत्र आल्यास मला सर्वाधिक आनंद - मंत्री दत्तात्रय भरणे

आय मिरर
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा समाज माध्यमात सुरू झाले आहेत. अर्थात या फक्त केवळ चर्चा आहेत खरंच पवार कुटुंबामध्ये समझोता झाला आहे का आणि पवार कुटुंब एकत्र येणार आहे का यावर यावरती पवार कुटुंबातील कोणीही बड्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
असं असलं तरी पवार कुटुंबातील अत्यंत जवळचे समजले जाणारे आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पवार कुटुंबाच्या एकत्र येण्यावरती भाष्य केलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एक झाली किंवा पवार कुटुंब एकत्र आलं तर बारामतीच्या शेजारच्या तालुक्यातील आमदार म्हणून मला याचा सर्वाधिक आनंद होईल. पवार कुटुंब एकत्र राहावं ही आमची इच्छा आहे,मात्र याबाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसार माध्यमांना इंदापुरात दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी 18 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी ब वर्ग प्रतिनिधी म्हणून दत्तात्रय भरणे यांनी भवानीनगर येथील श्री छत्रपती हायस्कूल या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आणि यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
छत्रपती कारखान्याचे अगोदरची परिस्थिती मजबूत होती मात्र आता थोडी नाजूक झाले आहे मात्र कारखान्याचं पूर्वीचे वैभव पुढे न्यायचा आहे असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये तुम्हाला कारखान्याची परिस्थिती बदललेली दिसेल असा दावाही भरणे यांनी केला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही पहिलीच निवडणूक असेल की त्यांनी फक्त चार सभा घेतला यापेक्षा जास्त सभा ते घेतात. उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मी स्वतः असेल आमच्या दोघांच्याही राजकारणाची सुरुवात याच कारखान्यापासून झाली असंही भरणे यांनी म्हटलं आहे. आमच्या दोघांचेही या कारखान्याची भावनिक नातं असल्याचं त्यांनी म्हटल आहे. आमच्या कारकीर्दीत हा कारखाना राज्यातील पहिल्या पाच मध्ये ओळखला जायचा ते दिवस पुन्हा श्री छत्रपतीला आणून देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार असेही त्यांनी म्हटलं.
कारखाना अडचणीत का आला?
कारखाना अडचणीत येण्यामागे कोणतेही संचालकांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही असं भरणे यांनी म्हटलं आहे. दुष्काळ जन्य परिस्थिती साखरेचे दर त्यामध्ये असणारे चढ-उतार यासह अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. यामुळेच कारखाना अडचणीत आला. या पुढील काळात सभासदांनी जर त्यांचा सर्व ऊस या कारखान्याला घातला तर पुढील दोन-तीन वर्षात कारखान्याची परिस्थिती बदलली तुम्हाला दिसेल. विरोध करणं हे विरोधकांचं काम आहे ते त्यांचं काम करत आहेत आम्ही आमचं काम करत आहोत त्यामुळे अडचणीत असणारा कारखाना बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचा मंत्री म्हणून मी स्वतः जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत.
मी फक्त श्री छत्रपती बाबत बोलणार हर्षवर्धन पाटलांच मला विचारू नका
दरम्यान मंत्री भरणे यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालवा जाणाऱ्या इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या परिस्थितीवरूनही भाष्य केले आहे.
मी केवळ छत्रपती कारखान्याबाबत बोलणार, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि निरा भीमा सहकारी साखर कारखाना याबाबत मी बोलणार नाही त्यातल्या कामगारांच्या पगारांबाबत मी बोलणार नाही. सभासदांच्या उसाच्या बिलांबाबत देखील मी काही बोलणार नाही. ते त्यांचं त्यांना लख लाभ मी कोणावर टीका करणार नाही.
देशाचं फेडरेशन वेगळं आहे आणि आमचं फेडरेशन वेगळं आहे. आम्ही त्याही कारखान्यांना मदत करू मात्र त्यांनीही ऊसाला खरंतर चांगला भाव दिला पाहिजे. देशाच्या फेडरेशनच्या अध्यक्षाचा कारखाना म्हणजे ऊस दराच्या बाबतीत पहिल्या पाच मध्ये असायला हवा. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठ्याचे क्षेत्र अतिशय जवळ आहे. सभासदांना चांगला बाजार भाव मिळायला हवा फेडरेशनच्या कारखान्याच्या अध्यक्षाचा कारखाना म्हणजे ऊस दराच्या बाबतीत तो देशात पहिल्या पाच मध्ये असायला हवा असा टोला भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता लगावला आहे.
संजय राऊत यांचं स्वर्गातील नर्क पुस्तक वाचणार...
तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकावरही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की हे पुस्तक मी वाचलं नाही मात्र त्यांचं पुस्तक मी वाचेल मला अधून मधून पुस्तक वाचण्याची सवय आहे असंही भरणे म्हणाले आहेत.
What's Your Reaction?






