बारामतीच्या बाबुर्डीत अवकाळीने नुकसान,घराचे पत्रे उडाले विजेचे खांबही जमिनीवर आडवे
आय मिरर
बारामती तालुक्यातील बाबुर्डी परिसरात अवकाळी पाऊस पाऊस कोसलाय.यासोबत जोराचा वादळ वारा सुटल्याने या परिसरात चार घरांचे पत्रे उडालेत.तर काही ठिकाणचे विजेचे खांबे कोसळले गेल्याने काही गांवे अंधारात गेली आहेत.
बाबुर्डी परिसरात शनिवारी दि.11 मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि वादळीवाऱ्याने गावातील चार शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. घरातील वस्तूंचे व अन्नधान्य भिजल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. वादळीवारे मोठया प्रमाणावर असल्याने गावातील धुळा सोमा महानवर, अशोक मारुती ढोपरे, बाळु गणपत नाळे, दादा माणिक गायकवाड, मंदा आनंद लोंढे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शिवाय वादळीवाऱ्याने वीजचे खांब मोडल्याने गावातील वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. घटनेची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांना कळवली असल्याचे गावच्या पोलीस पाटील सौ.वनिता राजकुमार लव्हे यांनी दिली. तर गावकामगार तलाठी सुरेश जगताप यांनी मा.तहसीलदार साहेब यांनी सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती दिली.
बाबुर्डीत झालेल्या वादळीवाऱ्याने घरांचे पत्रे उडाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन घरातील अन्नधान्य व इतर वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याबाबत तात्काळ पंचनामे करुन मदत मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. - ज्ञानेश्र्वर पोमणे (मा. सरपंच, बाबुर्डी)
What's Your Reaction?