बीडच्या सरपंचाची निर्घृण हत्या ! शरद पवार तेराव्याला मस्साजोगला जाणार
आय मिरर
केज तालुक्यातील मस्साजोग गावेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यासह देशात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चा होतायत. हत्येच्या दहा दिवसानंतर आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या देशमुख हत्या प्रकरणाला गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद हे आता बीडला जाणार आहेत.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरला संपत आहे. हे अधिवेशन संपताच दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे बीडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या संदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी माहिती दिली आहे.बजरंग सोनावणे म्हणाले, शरद पवार हे 21 तारखेला सकाळी मस्सजोग गावाला येणार आहेत. 20 तारखेला ते संभाजीनगर ला मुक्काम करणार आहेत. कुटुंबाची भेट घेत सांत्वन करणार आहे. तसेच हत्येची पाळमुळं कुठपर्यंत आहेत याचा शरद पवार आढावा घेणार आहेत. बीड जिल्ह्यात बऱ्याच घटना घडल्या आहेत. खोलात जाऊन गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी यासाठी शरद पवार स्वतः तिथे जात आहे. ही घटना खूप वाईट आहे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी शरद पवार बीडमधे येत आहेत.
आरोपींकडून काय काय जप्त केले?
बीडमध्ये आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत यात राजकीय हेतू आजिबात नाही. संतोष देशमुख खून प्रकरणी 7 आरोपी दाखवले आहेत. त्यातले दोन आरोपी पहिल्या दिवशी अटक केला होता मात्र त्याच्याकडून काय काय सामान जप्त केलं ते पोलिसांनी सांगितल नाही. अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाला आज अटक झाल्याचं समजत आहे. आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे. आणखी 3 आरोपी फरार आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे. CBI मार्फत चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे. पंकज कुमावतसारख्या अधिकाऱ्याकडे तपास दिला पाहिजे ही माझी मागणी आहे.
आतापर्यंत चार जणांना अटक
मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड शहराजवळ पाठलाग करून अटक केली आहे. त्याला आता लवकरच न्यायालयासमोर हजर केले जाणार असून या प्रकरणातील आतापर्यंत चार आरोपींना अटक केले असल्याची माहिती बीडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे.
What's Your Reaction?