कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा ! अजितदादांचं केंद्राला पत्र

Dec 19, 2024 - 13:19
Dec 19, 2024 - 13:22
 0  189
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा ! अजितदादांचं केंद्राला पत्र

कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी अजित पवारांनी केंद्र सरकारला हे पत्र पाठवलं आहे.

कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क हटवण्यात यावं यासाठी अजित पवार यांनी केंद्र सरकार ला एक पत्र पाठवलं आहे.आमदार नितीन पवार, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे यांच्या मागणीनुसार कांद्यावरील 20 टक्केनिर्यातशुल्क हटवण्यासाठी अजितदादांनी केंद्र सरकारला हे पत्र लिहलं आहे.

श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow