70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झालेय - नाना पटोले
आय मिरर
झालेल्या मतदानाची स्पष्टता निवडणूक आयोग का देत नाही? याबाबत काँग्रेसनं आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. रात्री उशिरापर्यंत कुठं मतदान झालं, त्याची सीसीटीव्ही फुटेजेस का देत नाहीत. 70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झालेलं आहे. याच्या स्पष्ट ते बाबत मुख्य निवडणूक आयोग यांना आम्ही मेमोरेंडम नव्हे तर कायदेशीर नोटीस आम्ही दिलेलं आहे.अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टता दिली नाही तर, आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. माननीय सुप्रीम कोर्ट ही ऐकला नाही तर, रस्त्यावरची लढाई लढायचा निर्णय आम्ही केलेला आहे. काही उमेदवारांना टेक्निकल बाबी लक्षात आल्या असल्यास त्यांनी अर्ज केलेला असावा. पवार साहेबांना त्याबाबतची काही माहिती मिळाली असेल त्या पुराव्याच्या आधारावर ते बोलत असतील, अशी खोचक ठेवा टीका ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केली आहे.
पुढच्या निवडणुकांना अजून वेळ आहे, त्याच्यापेक्षा जे काही आता निवडणुकांमध्ये गोंधळ निवडणूक आयोगाकडून झाला तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं हीत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीची चर्चा आज करण्यापेक्षा निवडणूक आयोगालाचं व्यवस्थित कसं करता येईल आणि लोकांच्या हक्काचे संरक्षण कसं करता येईल, हा प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचा असल्याचे वक्तव्य ही नाना पटोले यांनी केलं आहे.
What's Your Reaction?