इंदापूरात प्रथमचं सलग चौथ्या वर्षी रंगणार नवरात्री महोत्सव फेस्टीवल,18 ऑक्टोंबर रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते होणार शुभारंभ
आय मिरर
इंदापूर करांना यंदाच्या नवरात्री महोत्सवात "नवरात्री महोत्सव फेस्टिवल २०२३"या विशेष कार्यक्रमाचा आनंद घेता येणार असून बुधवार दि.१८ आँक्टोंबर रोजी BIG BASH EVENT च्या शुभारंभापासून याची सुरवात होणार आहे.
माजी नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे यांच्या माध्यमातून इंदापूरात प्रथमचं सलग चौथ्या वर्षी रंगणार नवरात्री मोहत्सव फेस्टीवल सिजन - 4 आयोजित केला असल्याची माहिती शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल गुंडेकर आणि सोएब भाई बागवान यांनी दिली.
इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे,बाजार समितीचे माजी सभापती विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे,संचालक मधुकर भरणे,मा.आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने,कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा,तहसिलदार श्रीकांत पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे,इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार या मान्यवरांच्या शुभहस्ते बुधवारी दि.१८ रोजी टेंभुर्णी नाका, सावतामाळी मंदिर परिसरात प्रभाग -७ मध्ये सायंकाळी ०६ वाजता याचा शुभारंभ होणार आहे.
या कार्यक्रमासाठी राइझिंग स्टार अँकेडमीचे फाउंडर अनिकेत गायकवाड,रोशनी काकडे,शफिक शेख,ऐश्वर्या मोरे यांच्यासह तीस कलाकारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सलग तीन दिवसांच्या कार्यक्रमातून म्हणजे दि.18,19 आणि 20 आँक्टोंबर महिलांना आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने असून महिलांसाठी प्रशस्त बैठक व्यवसा करण्यात आली आहे.तर गांधी सराफ (बारामतीकर ) श्री. नरेंद्र गांधी व श्री. तन्मय गांधी यांच्या वतीने लकी ड्रॉ ३ भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ दिली जाणार आहे.मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रमेश शिंदे, शोएब भैय्या बागवान, राहुल शेठ गुंडेकर यांच्यासह आदित्य बोराटे, महेश ढगे, अजित राऊत, गौरव राऊत, रहिम बागवान, सागर राऊत, अमोल राऊत, सचिन शिंदे, सौरभ शिंदे, सोहल बेपारी, प्रतिक झोळ, अजिंक्य बंगाळे,राजन पवार, प्रसाद चेंदके,शक्ती पलंगे, नेहा कोल्ड्रींक्स ॲण्ड आईस्क्रीम, इंदापूर, गुरुकृपा सांस्कृतिक भवन, इंदापूर महात्मा फुले ग्रुप, इंदापूर, महात्मा फुले दहिहंडी संघ, इंदापूर, नगरसेवक पोपट शिंदे मित्र परिवार इंदापूर इंदापूर नगरपरिषद, इंदापूर, पोलिस स्टेशन, इंदापूर, पत्रकार बंधू इंदापूर, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, इंदापूर, घुले मंडप अँण्ड डेकोरेटर्स, नातेपुते, सुत्र संचालक संतोष नरुटे यांच्या विशेष सहकार्य हा कार्यक्रम पार पडणार आहे.
What's Your Reaction?