दुष्काळाच्या सावटाचा विचार करुन योग्य आराखडा तयार करा - आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Dec 1, 2023 - 18:46
 0  741
दुष्काळाच्या सावटाचा विचार करुन योग्य आराखडा तयार करा - आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

आय मिरर

इंदापूर तालुक्यात यावर्षी पावसाने पाट फिरवल्याने आणि उजनी धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने यावर्षी पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागणार आहे.या पार्श्वभुमीवर आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दि.०१ डिसेंबर रोजी इंदापूर पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय बैठक घेत पाणी टंचाईचा आढावा घेतला. भविष्यातील दुष्काळाच्या सावटाचा विचार करुन अधिका-यांनी योग्य आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार भरणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सोबत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना ही आमदार भरणे यांनी इंदापूर तहसीलदारांना केल्या आहेत.

यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,मा.जि.प सदस्य श्रीमंत ढोले,प्रतापराव पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पं.स.सदस्य सतिश पांढरे, अँड.एल. पी.शिंगाडे,नवनाथ रुपनवर, काकासाहेब देवकर,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुरेखा पोळ,लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांसह विविध खात्याचे अधिकारी,कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

आ.भरणे म्हणाले की,पाणी टंचाई आराखडा कामामध्ये कोणीही हयगय करु नका,कोणाचीही गय केली जाणार नाही. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असला तरी सुट्टी घेऊ नका,दोन तीन दिवस अवधी आहे चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करा.परिस्थितीला गांभिर्याने घ्या.विचारपूर्वक आराखडा सादर करुन त्यातून आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि त्यातून उपाययोजना करता येतील.यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत.

तहसीलदार श्रीकांत पाटील प्रास्ताविक मध्ये म्हणाले की,यादी तयार करावी लागेल की पाणी कुठे मिळेल. त्या बोअर आणि विहिरी अधिग्रहन करणाव्या लागतील. टँकरने पाणी पुरवठा हा शेवटचा पर्याय आहे. गावनिहाय बैठका घेऊ. त्यानुसार त्या त्या गावचा आराखडा तयार करावा लागेल.हा टंचाई आढावा खुप महत्वाचा आहे.यापुढे नियमित वैठका घ्याव्या लागतील. तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात असून दिवसाला साडेचार लाख मेट्रीक टन चारा जनावरांसाठी लागणार आहे.त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की,२०१९ नंतर पाणी टंचाईची बैठक घेणे प्रथमचं आवश्यक वाटले आहे. हातपंप दुरुस्तीसाठी सर्व यंत्रणा उपलब्ध असल्याने कोणतीही अडचण येणार नाही.मनरेघा मधून विहिरींसाठी जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवावेत.जेणेकरुन बोअरवेल विहिरी अधिग्रहण करता येतील.

दरम्यान झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे, वरकुटे खुर्दचे बापूराव शेंडे,सौरभ झगडे,सतिश हेगडकर,चित्रलेखा ढोले,राहुल वागळे, बाळासाहेब करगळ,श्रीमंत ढोले,बाळासाहेब भोसले,सागर बनकर,वैभव जाधव,कुशाबा भिसे,प्रतापराव पाटील यांसह अनेक सरपंच उपसरपंचांनी प्रशासनासमोर काही तक्रारी मांडत त्या सोडवण्यासाठी सूचना मांडल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow