BIG BREAKING भाजपच्या पुणे जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटलांची दांडी
आय मिरर
पुणे जिल्हा भाजपच्या दौंड मधील अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील यांनी गैरहजेरी लावलीय या कार्यक्रमाला भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी निमंत्रण दिले होते मात्र तरीही हर्षवर्धन पाटील गैरहजर राहिल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यावर भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत.त्यांना मी स्वतः इंदापूर मधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलं होतं. कोणाला या कार्यक्रमाला येता आलं नाही तर ते आपल्याला कळवतात परंतु हर्षवर्धन पाटील यांची अनुपस्थिती आज का आहे हे मी त्यांच्याशी बोलून कळवेल,मात्र अद्याप तरी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून अनुपस्थित राहण्याचं कारण मला समजलं नसल्याचं जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी म्हटल आहे.
भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीण दक्षिण विभागाचं जिल्हास्तरीय अधिवेशन पुण्याच्या दौंड मध्ये आज पार पडले. या जिल्हा अधिवेशनाचं भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण होतं. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी स्वतः हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो या ठिकाणी उपस्थिती लावत हर्षवर्धन पाटील यांना परवा या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलं होतं, मात्र असं असतानाही हर्षवर्धन पाटील यांनी या जिल्हा अधिवेशनाला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
What's Your Reaction?