काहींनी जाणीवपूर्वक जवळचीच लोकं पावणंरावळं विकास कामांपासून दूर ठेवलं - आ.भरणेंचा विरोधकांना टोला

Oct 16, 2023 - 06:12
 0  995
काहींनी जाणीवपूर्वक जवळचीच लोकं पावणंरावळं विकास कामांपासून दूर ठेवलं - आ.भरणेंचा विरोधकांना टोला

आय मिरर

इंदापूर तालुक्यात तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जवळचा लांबचा पावणा रावळा कोणत्या जातीपातीचा याचा कुठेही विचार न करता विकास कामे केली जातात, परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक या भागातील विकास कामे प्रलंबित ठेवली. जवळचीच लोक, तसेच पाहुणेरावळी विकास कामांपासून दूर ठेवली असा टोला माजी राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी सहकार मंत्री तथा भाजप भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला.

रविवारी दि.15 आँक्टो रोजी इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील चव्हाणवाडी, बंबाडवाडी,येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार भरणे यांचे शुभहस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते. 

चव्हाणवाडी (ता. इंदापूर) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी भरणे बोलत होते. जि. प. माजी सदस्य प्रताप पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकाळ, छत्रपती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, लासुर्णे चे सरपंच रुद्रसेंन पाटील, उद्योजक प्रीतम जाधव, कुरवली चे सरपंच राहुल, विजय निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य अमित चव्हाण, दीपक लोंढे, निखिल भोसले, गणेश चव्हाण, हर्षवर्धन चव्हाण, सागर पवार, सचिन खरवडे, आदी उपस्थित होते.

भरणे पुढे म्हणाले की, विकास कामे ही जातीपातीवर होत नसतात तर ती तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने ही त्याची जबाबदारी असते म्हणून आम्ही या गोष्टीचा विचार करून चव्हाणवाडी च्या परिसरातील तसेच आजूबाजूला असणारे सर्व रस्ते मंजूर केले असून काही रस्त्यांची कामे सुरू आहेत तर काहींची पूर्ण झालेली आहेत.यापुढे ही या भागातील अनेक कामांचे प्रस्ताव प्रलंबित असून लवकरच या कामांना निधी देण्याचे जाहीर या वेळी आमदार दत्तात्रय भरणे केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow