डिकसळ परिसरात बिबट्या सदृष्य प्राण्याची दहशत,नागरिकांनी खबरदारी घेण्याचे सरपंचांनी केले आव्हान

Oct 16, 2023 - 15:01
Oct 16, 2023 - 15:02
 0  1423
डिकसळ परिसरात बिबट्या सदृष्य प्राण्याची दहशत,नागरिकांनी खबरदारी घेण्याचे सरपंचांनी केले आव्हान

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील शेतकरी सतिश बाशीराम झाकणे यांचे वासरु बिबट्याने पळवून नेऊन ते खाऊन टाकल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक 16 रोजीच्या सकाळी ही घटना घडल्याचे स्वत: त्यांनी सांगितले आहे. सदर बिबट्याला शेतकऱ्यांच्या शेतात फिरताना येथील शेतकरी राजेंद्र गोरख झाकणे यांनी पाहिल्याची माहिती प्राप्त होत आहे.

सदर घटनेची माहिती पोलीस पाटील संदीप पवार यांनी वन विभागाला दिल्यानंतर वनरक्षक यु.डी. मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुरांच्या गोट्याची व शेताची पाहणी केली. नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन सरपंच मनीषा गवळी यांनी केले आहे. 

सदर घटनेविषयी वनरक्षक यु.डी.मोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली असल्याचे सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow