बिजवडीत वनविभागाच्या जागेत चारीत आढळले नवजात जिवंत बालक
आय मिरर
इंदापूर तालुक्यात बिजवडी गावच्या हद्दीत वनविभागाचे जागेत कच्च्या रोडचे लगत एका चारीमध्ये जन्मलेले दोन तास वयाचे एक महीला जातीचे नवजात जिवंत बालक आढळून आले असून इंदापूर पोलीसात अज्ञात स्त्री विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात बापु ज्ञानदेव पालवे रा.बिजवडी ता. इंदापुर जि. पुणे यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि 16 डिसेंबर 2023 रोजी रात्री 08 वाजण्याचे सुमारास मौजे बिजवडी गावचे हद्दीत ससाणे यांचे घराचे पाठीमागील वनविभागाचे जागेत कच्च्या रोडचे लगत एका चारीमध्ये एक महीला जातीचे नवजात जिवंत बालक/अर्भक वय अंदाजे 2 तास कोणीतरी अज्ञात स्त्रीने पुर्णता परीत्याग करण्याच्या उद्देशाने उघड्यावर टाकुन दिले असल्याचे निदर्शनास आले.त्यानुसार फिर्यादीच्या तक्रारीवरुन इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे हे करीत आहेत.
What's Your Reaction?