Crime News: पतीने पत्नीचे हात बांधले अन् थेट...

आय मिरर
गणेगाव खालसा ता. शिरुर येथील वरुडे रोड येथे एका इसमाने पत्नीचा गळा आवळून खून करुन फरार झाल्याची घटना घडली आहे. मीनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे असे मृत महिलेचे तर ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे असे फरार खुनी पतीचे नाव आहे.
दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह छवविच्छेदन साठी पाठवून दिला. सदर घटनेत मीनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय २७ वर्षे सध्या रा. गणेगाव खालसा वरुडे रोड ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चाळीसगाव जि. जळगाव या महिलेचा खून झाला असून महिलेचा पती ज्ञानेश्वर गांगुर्डे हा खून केल्यानंतर फरार झाला.
तर याबाबत ताराचंद सुखलाल मोरे वय २६ वर्षे सध्या रा. गणेगाव खालसा वरुडे रोड ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चाळीसगाव जि. जळगाव यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे वय ३२ वर्षे सध्या रा. गणेगाव खालसा वरुडे रोड ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चाळीसगाव जि. जळगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
गणेगाव खालसा ता. शिरुर येथील वरुडे रोड येथे ज्ञानेश्वर गांगुर्डे या इसमाचे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पत्नीसोबत वाद झालेले होते. त्यांनतर सर्वजण झोपी गेले आणि पहाटेच्या सुमारास ज्ञानेश्वर घरातून बाहेर गेल्याचे शेजारील व्यक्तींनी पाहिले. मात्र सकाळच्या सुमारास बराच वेळ मीनाबाई घरातून बाहेर येत नसल्याने मीनाबाई यांचा चुलत भाऊ ताराचंद त्यांना आवाज देण्यासाठी गेला. त्यावेळेस मीनाबाईचे हात व गळा दोरीने बांधलेल्या अवस्थेत आणि मीनाबाई मृतावस्थेत पडल्याचे ताराचंद यांना दिसले.
याबाबतची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसिचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, शिवाजी मुंडे, पोलीस हवालदार संदीप जगदाळे, विजय सरजीने, सागर सरवदे, पोलीस पाटील श्रीकांत झांजे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता ज्ञानेश्वर याने पत्नी मीनाबाईचे हात बांधून दोरीने गळा आवळून खून केला असल्याचे समोर आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे हे करत आहेत.
What's Your Reaction?






