सततच्या 'इंदापूर बंद'मुळे भरडला जातोय व्यापारी ! यापुढे बंद नको इंदापूर तहसीलसह पोलीसांना व्यापाऱ्यांचे निवेदन

Dec 12, 2023 - 12:25
Dec 12, 2023 - 12:26
 0  1790
सततच्या 'इंदापूर बंद'मुळे भरडला जातोय व्यापारी ! यापुढे बंद नको इंदापूर तहसीलसह पोलीसांना व्यापाऱ्यांचे निवेदन

आय मिरर

वारंवार विविध कारणांमुळे इंदापूर शहर बंद पुकाराला जातोय यामुळे होणारे व्यापारी बांधवांची गळचेपी व नुकसान थांबविणेसाठी यापुढे इंदापूर बंद पुकारू नये अशी भूमिका इंदापूर शहर व्यापारी असोसिएशन ने घेतलीय.शहरातून मोर्चा काढत या संदर्भातील लेळी निवेदन इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील आणि इंदापूर पोलिसांना व्यापारी वर्गांने दिले आहे.

या निवेदनावर अध्यक्ष भरत शहा,उपाध्यक्ष संदीप वाशिंबेकर,सचिव मेघशाम पाटील,सहसचिव दिलीप कासार यांच्या सह्या आहेत.

यापुढे इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने व्यवसाय, उद्योगांना मारक ठरणाऱ्या अशा बंदला आम्ही आमची दुकाने व व्यवसाय बंद ठेवणार नाही असा निर्णय इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने घेण्यात आला आहे. 

विविध संघटना, पक्षांकडून वेळोवेळी काही घटना घडल्यास त्याचा निषेध म्हणून इंदापूर शहर बंद चे आवाहन करण्यात येते. त्यामुळे शहरातील सर्व व्यापारी वर्ग, छोटे व्यापारी, लघु उद्योग, फेरीवाले, पथारी व इतर पदपथावरील छोटे व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी व्हावे लागते. परंतु असे बंद वारंवार झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे, लघु, मध्यम व्यवसाय असणाऱ्यांचे, दुकानात असणाऱ्या कामगार, मोलमजुरी करणारे बांधव यांचे आतोनात नुकसान होत आहे.

अस असताना मागील काही वर्षामध्ये कोरोना काळ व मागील दसरा, दिवाळी इ. सणावारांच्या दिवशी ही अशाप्रकारचे बंद ठेवण्यात आले. ही बाब प्रशासनास आम्ही वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेली आहे. इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने निवेदने दिलेली आहेत. परंतु ह्या विषयी प्रशासन आणि सामाजिक संघटना, सर्वच पक्षांनी याची दखल घेतलेली नाही.याचा गांभीर्याने विचार करून ,व्यवसायिकांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही अशी मागणी इंदापूर शहर व्यापारी असोसिएशनेन निवेदनाद्वारे केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow