2024 च्या निवडणूकीत प्रत्येक प्रस्थापित आमदाराच्या घरावर बहिष्कार मोर्चे काढून त्यांना पाडण्याची व्यवस्था आम्ही करणार ; जालन्यातील घटनेनंतर मराठा समाजाने इंदापूरात दिला इशारा
आय मिरर
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी इथं मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर पुण्याच्या इंदापूरमध्ये रात्री उशीरा वीरश्री मालोजीराजे भोसले चौकात सकल मराठा समाजाने जय भवानी जय शिवाजी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळालेच पाहिजे…मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे…दडपशाही सरकारचं करायचं काय खाली मुंड वर पाय अशी घोषणाबाजी करत मराठा समाज बांधव जालन्याच्या दिशेने आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रवाना झालेत.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक योगेश केदार देखील सहभागी झाले होते.
येणाऱ्या चार दिवसात राज्य सरकारला मोठा आक्रोश पाहायला मिळेल. मराठा समाजाला ओबीसी मधून 50% च्या आत आरक्षण द्यावे सरकारने तसा कायदा करावा अन्यथा येणाऱ्या 2024 च्या निवडणूकीत प्रत्येक प्रस्थापित आमदाराच्या घरावर बहिष्कार मोर्चे काढून त्यांना पाडण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. या प्रस्थापित आमदारांना पाडून सर्वसामान्यांना नेतृत्व म्हणून आम्ही पुढे आणू शकतो ही ताकद मराठा समाजाची आहे. 50% लिंगायत समाजाने कर्नाटकात भाजपाचे सरकार पाडले आम्ही तर 32 टक्के पेक्षा जास्त आहोत असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक योगेश केदार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
What's Your Reaction?