काल मुलाचे लग्न आणि दुख:चा डोंगर ! हृदयविकाराच्या धक्क्याने निरगुडेच्या हनुमंत काजळे यांचा मृत्यू
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील हनुमंत आत्माराम काजळे यांचे आज सोमवारी 15 जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेय. कालच रविवारी 14 जुलै रोजी त्यांच्या मुलाचा विवाह संपन्न झाला होता. हनुमंत काजळे यांच्या निधनाने काजळे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळाय.
हनुमंत काजळे हे सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दौंड तालुक्यातील राजेगाव शाखेत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते गेल्या दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते परंतु त्यांच्या कामाचा अहवाल पाहून जिल्हा बँकेने त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ दिली होती.पुणे जिल्ह्यात भोर, दौंड, बारामती, इंदापूर या तालुक्यातील अनेक शाखेत त्यांनी सेवा बजावली आहे.
What's Your Reaction?