शरद पवार आमचे दैवत - अजित पवार गटातील प्रवीण मानेंची प्रतिक्रिया, सोनाई कडून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
आय मिरर
सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने पुण्याच्या इंदापूर मध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलं जाणार असल्याची माहिती सोनाई उद्योग समुहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वी 2018 ला सोनाई कडून असा सोहळा घेण्यात आला होता. यावर्षी तो पुन्हा घेतला जात असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आमचे दैवत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह शरद पवारांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण देणार आसल्याचं प्रवीण माने यांनी सांगितले आहे.
प्रवीण माने म्हणाले की,आजची पत्रकार राजकीय नाही.सामाजिक गोष्टींसाठी आजची पत्रकार परिषद आहे.सोनाई प्रतिष्ठान च्या माध्यमातून परंपरेप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवत असतो.सोनाईचे प्रतिष्ठाने प्रमुख दशरथ माने यांच्या मार्गदशर्नाखाली हे होते.यावर्षी आपण सर्व धर्मिय सामुदायीक विवाह सोहळा घेणार आहोत.२०१८ ला हा सोहळा घेतला होता,त्यात ७४ विवाह झाले होते.कोरोना नंतर पुन्हा आयोजन आले आहे.सोन्याच्या मंगळसुत्रापासून चमचा पर्यंत सर्व देणार आहोत. यावर्षी चांगला पाऊन झाला नाही, लोक संकटात आहेत.म्हणून हा निर्णय घेतला आहे.आगामी काळात प्रतिष्ठान च्या माध्यमातून लोकांना मदत केली जाईल.
उद्याचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात केला जाईल.१८ जुलै ते ५ आँगस्ट दरम्यान याची विवाह नोंदणी केली जाईल.सायंकाळच्या गोरज मुहुर्तावर हा सोहळा पार पाडला जाईल.शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व अधिन राहुन हा सोहळा पार पाडला जाईल असं ही माने यांनी सांगितले.
What's Your Reaction?