देशाचं कृषिमंत्री पद रिक्त हे दुर्दैव - खा.सुळेंची इंदापुरात भाजपावर टीका 

Jan 28, 2024 - 20:56
Jan 28, 2024 - 20:58
 0  366
देशाचं कृषिमंत्री पद रिक्त हे दुर्दैव - खा.सुळेंची इंदापुरात भाजपावर टीका 

आय मिरर(देवा राखुंडे)

भारत हा कृषिप्रधान देश आहे परंतु या देशाला कृषि मंत्री नाही देशाला शरद पवार हे कृषिमंत्री म्हणून दहा वर्ष मिळाले त्यांनी तुमच्या आशीर्वादाने काम केले. त्यानंतर देशात परिवर्तन झाले नवीन मंत्री आले परंतु आज कृषिमंत्री पदाची जागा रिक्त आहे हे आपले दुर्दैव असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

खा.सुळे इंदापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या कृषि प्रदर्शनाच्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीतील आमदार दत्तात्रय भरणे व यशवंत माने यांच्या समोरच राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. 

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कांद्याची परिस्थिती काय आहे.? दुधाची परिस्थिती काय आहे.? या प्रश्नावर आवाज उठवला कांद्याला भाव मागितला माझे चुकले का.? तर माझे लोकसभेत पहिल्यांदा निलंबन झाले माझे काय चुकले असा प्रश्न त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला.

त्या पुढे म्हणाल्या, तीन वेळा तुम्ही मोठ्या संख्येने मला मतदान करून खूप मोठी संधी व जबाबदारी दिलं. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासोबत काम केले. गेली पंधरा वर्षे मी जनतेची सेवा करण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न करत आहे.

यावेळी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांना बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही माझ्याबद्दल चांगले बोललात. माझ्या कामाचे कौतुक केले. परंतु लोकप्रतिनिधीचे कामच असते लोकांची कामे करणे, तुमच्या सोलापूरच्या खासदारांबद्दल तर लोक काय काय बोलतात.? ते मतदारसंघातही नसतात, आणि लोकसभेतही, एक रुपयाचा कडीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता असे म्हणत त्यांनी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर टीका केली.

यावेळी बोलताना इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले. या शेतकरी मेळाव्यामुळे परिसरात नागरिकांना विविध तंत्रज्ञान माहिती होणार आहे. त्यामुळे इंदापुरात सहकार मजबूत करण्याचे काम सुरू असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी मोहोळचे माजी आ.राजन पाटील, आ. दत्तात्रय भरणे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन तथा संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी केले तर आभार उपसभापती रोहित मोहोळकर यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासह शेतकरी वर्ग उपस्थित होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow