कांदलगावचा पै.सौरभ सोनवणे कुस्तीत राज्यात पहिला, उत्तरप्रदेशातील गोंडात होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड

Dec 30, 2023 - 20:29
 0  348
कांदलगावचा पै.सौरभ सोनवणे कुस्तीत राज्यात पहिला, उत्तरप्रदेशातील गोंडात होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड

आय मिरर

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अंडर फिफ्टीन कुस्ती स्पर्धेमध्ये 41 किलो वजनी गटामध्ये इंदापूर तालुक्यातील कांदलगांव मधील पै.सौरभ विजय सोनवणे याने घवघवीत यश संपादन करीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या विजयाने कुस्ती क्षेत्रात त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्याच्यावर सौरभवर मित्र परिवार आणि गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पै.सौरभ याच्या कामगिरीची दखल घेऊन उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आलेली असून तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सौरभ सोनवणे हा कांदलगावचा सुपुत्र असून तो सध्या कुस्तिसम्राट अस्लम काझी यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील छत्रपती शिवराय क्रिडा संकुलात प्रशिक्षण घेत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow