दीड एकर केळीच्या बागेवर फवारलं अज्ञातानं तणनाशक ! शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान, इंदापुरात इथे घडली घटना

Oct 9, 2024 - 21:03
 0  801
दीड एकर केळीच्या बागेवर फवारलं अज्ञातानं तणनाशक ! शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान, इंदापुरात इथे घडली घटना

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील नरूटवाडी येथील शिवाजी कोकाटे यांच्या केळीच्या बागेवर अज्ञातांनी तननाशक फवरले आहे. यामुळे या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे.हा शेतकरी आता इंदापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करणार आहे.

कोकाटे यांची दीड एकर केळीची बाग होती आणि अगदी चार आठ दिवसात ही बाग हार्वेस्टिंग होणार होती.चांगला दर ही मिळणार होता. मात्र कोणी तरी खोडसळपणा म्हणून या केळीच्या बागेतील केळी घडांवर तण नाशक फवारल्याने कोकाटे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे.

कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ बाजारातील कोसळलेले दर कधी यासह अनेक अडचणींनी शेतकरी ग्रासलेला असताना आता शेतकऱ्यांपुढे अशा पद्धतीची नवी संकट उभे राहत आहेत. खोडसळपणातून केलेली एखादी गोष्ट खुप मोठा परिणाम करुन जाते.कोकाटेंसोबत देखील असचं काहीसं घडलं आहे. यामुळे आता तोंडाशी आलेला घास हिसकावला गेल्याने अशा खोडसळपणा करणाऱ्यांच्या वेळीच मुसक्या आवळणं गरजेचं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow