दौंड मध्ये पिकअपने विद्यार्थ्यांला उडवले,एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

आय मिरर
दौंड पाटस अष्टविनायक मार्गावरील बिरोबावाडी गावच्या हद्दीत अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यु झाल्याची घटना घडलीय. आयुष यादव असं या मुलाचं नाव असून या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्ता अडवून धरला आहे या घटने संदर्भात आता पाटस पोलीस आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शाळेला येताना रस्ता ओलांडत असताना भरधाव पिकअप ने धडक दिल्याने या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.या अपघातानंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवून धरत ठिय्या आंदोलन केलेय.
अष्टविनायक मार्ग रोखून धरला या ठिकाणी स्पीड ब्रेकर ची मागणी केली आहे.जो पर्यंत स्पीड ब्रेकर होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी देखील ग्रामस्थांच्या या मागणीला आंदोलनात सहभागी होत पाठींबा दर्शवला आहे.
What's Your Reaction?






