इंदापूरात किळसवाणा प्रकार ! 80 वर्षाच्या वृद्धाने केला 26 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार

Sep 27, 2024 - 12:31
Sep 27, 2024 - 13:57
 0  3510
इंदापूरात किळसवाणा प्रकार ! 80 वर्षाच्या वृद्धाने केला 26 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार

आय मिरर

इंदापूर तालुक्यामध्ये ८० वर्षाच्या वृद्धाने २६ वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबधित आरोपीला तातडीने अटक केली आहे. 

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार २२ सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील एका गावामधील एका २६ वर्षीय मतीमंद मुलीवर ८० वर्षाच्या वृद्धाने बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली.

 

या घटनेची माहिती होताच वालचंदनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन संबधित आरोपीला अटक केली. या घटनेचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद मिठ्ठापल्ली करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow