पुणे पोलीसांचा दरारा ! गजा मारणे, बाबा बोडके, घायवळ यांच्यासह 200 ते 300 गुन्हेगारांची एकाच वेळी परेड
आय मिरर
विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयातील गुंडाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांवर व सरकारवर टीका केली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच राजकारणात एकच खळबळ उडाली होती. पुण्यातल्या गुन्हेगारांच्या टोळीप्रमुखांचे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारांच्या टोळी प्रमुखांची आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांची आज पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात परेड घेण्यात आली.
पुण्यातल्या गुन्हेगारांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयात हजेरी लावली आहे. गजानन मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ याच्यासह इतर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आज पुणे पोलिसांनी परेड घेतली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व गुन्हेगारांना आज आयुक्तालयात बोलवले होते.
पुणे पोलीस आयुक्तालयात आज 200 ते 300 गुन्हेगारांची आज हजेरी घेण्यात आली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेली या कारवाईची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त स्वतःच गुंडांना तंबी देणार आहेत, अशी चर्चा आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ताकिदच पोलिसांनी दिली आहे.
What's Your Reaction?