भाजपात प्रवेश करणाऱ्या दगडवाडीतील कार्यकर्त्यांची एका रात्रीत घरवापसी,आमदार भरणेंची जादू चालली
आय मिरर
नीरा नदीच्या काठावर वसलेले दगडवाडी हे छोटेसे गाव.एका रात्रीत संपूर्ण इंदापूर तालुक्यात अचानक प्रकाश झोतात आले आहे.या गावाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नेहमीच मोलाची साथ निभावलेली आहे. तसेच आमदार भरणे यांनीही या गावाला विकासाच्या बाबतीत कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन इतर गावांच्या तुलनेत दगडवाडीला झुकते माप आजवर दिले आहे.
गेल्या चारच दिवसांपूर्वी आमदार दत्तात्रय भरणे यांची जंगी सभा दगडवाडी ग्रामस्थांनी आयोजित केली होती.यामध्ये आमदार भरणे यांनी सपत्नीक या कार्यक्रमाला उपस्थित राहून ग्रामस्थांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता.मात्र यास दोन दिवस उलटत नाहीत तोच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दगडवाडीतील राष्ट्रवादीच्या मोजक्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या.त्यामुळे हा पक्षप्रवेश म्हणजे आमदार दत्तात्रय भरणे यांना धक्का बसल्याच्या वावड्याही उठवल्या गेल्या.
परंतु तालुक्यातील प्रत्येक गावामधील हर एक कार्यकर्त्याशी वैयक्तिक संपर्कात असलेल्या चाणाक्ष आमदार दत्तात्रय भरणे यांनी एका रात्रीत सारी सूत्रे फिरवून गैरसमजुतीतून भाजपात गेलेला एकमेव राष्ट्रवादीचा कार्यकर्ता माघारी तर आणलाच परंतु त्याचबरोबर भाजपातीलच अनेक युवा सहकारी फोडून राष्ट्रवादीच्या तंबूत आणले आहेत.त्यामुळे आमदार भरणे यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनाच पुनश्च एकदा धक्का दिला आहे.
आज पुणे येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच भाजपात गेलेले भारत सूळ यांच्यासह प्रमोद राजे- निंबाळकर,दादा मोटे,रमेश होळ
संतोष होळ,वसंत सुळ (सर) आदी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी सरपंच संजय केसकर,पोपट काळे,दादाराम सुळ,महादेव कवितके, दादाराम काळे,महादेव जानकर, नाथा पारेकर उपस्थित होते.
गेल्या महिन्याभरापासून हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडून आमदार भरणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.आमदार भरणे यांच्या या धक्का तंत्राने हर्षवर्धन पाटील चांगलेच गोत्यात आले असून ते पूर्णपणे बॅकफुटवर गेले आहेत.त्यामुळे दगडवाडीतील पक्षप्रवेशाने त्यावर फुंकर मारण्याचा प्रयत्न पाटील यांच्याकडून केला जात होता.मात्र त्याठिकाणी भाजप प्रवेशाचा बार फुसका निघाला असल्याने हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा तोंडघशी पडले असल्याची टीका तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केली आहे.
कालचा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे झालेला पक्षप्रवेश हि निव्वळ धुळफेक असुन यामध्ये काहीही तथ्य नाही.सुळ यांचा भाजपमध्ये फसवून प्रवेश घेण्यात आला.तर बाकीचे तिघेजण तर मुळ भाजपवालेच आहेत.त्यामुळे प्रसारित झालेल्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये.आम्ही सर्वजण एका दिलाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे असून येणाऱ्या काळामध्ये दगडवाडी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य राष्ट्रवादीला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भारत सुळ यांनी दिल्याची माहिती ही कोकाटे यांनी दिली.
तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे स्वागत करताना सांगितले की,आपण करत असलेल्या विकासकामांचा झंझावत पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याने खोट्या पक्षप्रवेशाची नौटंकी करून जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काहीजण करत आहेत. यामध्ये त्यांना तुसभरही यश मिळवू देणार तर नाहीच उलटपक्षी येणाऱ्या काळामध्ये भाजपातीलच अनेक मातब्बर आपल्याकडे येणार आहेत.
तसेच ग्रामस्थांनी केलेल्या मागणी वरून मौजे दगडवाडी येथील बी. के. बी. एन. रस्ता ते होळ- मोरे वस्ती ते वसंत सुळ वस्ती रस्ता आणि वसंत सुळ वस्ती, संजय मोटे वस्ती ते चव्हाण वस्ती रस्त्यासाठी प्रत्येकी १५ लाखांचा निधी आ.भरणे यांनी जाहीर केला आहे.
What's Your Reaction?