इंदापूर बाजार समितीत २४ ते २८ जानेवारी दरम्यान पार पडणार "इंदापूर कृषी महोत्सव २०२४"

Jan 9, 2024 - 17:48
 0  1146
इंदापूर बाजार समितीत २४ ते २८ जानेवारी दरम्यान पार पडणार "इंदापूर कृषी महोत्सव २०२४"

आय मिरर

कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूरने मुख्य बाजार इंदापूर शिवलिलानगर, डाळींब मार्केट, अकलुज रोडलगत, इंदापूर येथील अद्यावत मार्केटमध्ये "इंदापूर कृषी महोत्सव-२०२४" अंतर्गत बुधवार दि. २४ जानेवारी २०२४ ते रविवार दि. २८ जानेवारी २०२४ दरम्यान पाच दिवसीय कृषी, पशु-पक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शन व डॉग शो तसेच पुणे जिल्हातील एकमेव घोडे बाजाराचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केलेले आहे. कृषी प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असलेची माहिती बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहित मोहोळकर, आमदार यशवंतराव माने व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.

कृषी प्रदर्शन व घोडे चाल स्पर्धा उद्घाटन समारंभ बुधवार दि. २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०३.०० वा.मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंतराव माने यांचे शुभहस्ते व PDCC बँक संचालक तथा बाजार समितीचे माजी सभापती व संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे अध्यक्षतेखाली व मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तर कृषी प्रदर्शन समारोप, बक्षीस वितरण समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांचे शुभहस्ते, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. संपन्न होणार आहे.

बाजार समितीचे "इंदापूर कृषी महोत्सव-२०२४ अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती औजारे-साधने, ऑटोमोबाईल्स, गृहउपयोगी आवश्यक वस्तु तसेच शेती/कृषी अनुशंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे कृषी प्रदर्शन २५० स्टॉल, ५० खाद्य स्टॉल, पशु-पक्षी, जनावरे प्रदर्शन आणि घोडे बाजार तसेच घोडे चाल(रवाल), नाचकाम स्पर्धा शिवाय स्मार्ट घोडे नर-मादी, नुकरा, मारवाड, काटेवाडी, सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण आहे. तर "डॉग शो" प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. 

शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुरुष-मुलांसाठी "महाराष्ट्राची लोककला" हा कार्यक्रम तसेच मुली-महिलांसाठी मोनाली करंदीकर यांचा "फुल टु धमाल" व "खेळ पैठणीचा" हा सुप्रसिद्ध कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. लहान व प्रोढांसाठी "मनोरंजनाचे खेळ" व खवय्यांसाठी "खाऊगल्ली" असे शिस्तबद्ध नियोजन केले जाणार आहे. तसेच इंदापूर शहर नविन प्रशासकीय इमारतीपासुन विद्यार्थी व नागरिकांसाठी दि. २४/०१/२०२४ ते २८/०१/२०२४ दरम्यान सकाळी १० ते रात्री१० वा. पर्यंत मोफत बससेवा सुविधा असे प्रदर्शनाचे नियोजन आहे. तसेच चालु वर्षी नव्याने अश्वरोहनातील ऑलम्पीक क्रिडाप्रकार प्रात्यक्षिके, महाराष्ट्र लोककला, बुलेट रायडींग असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.

शेतकरी बांधव दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती यावर मात करुन ऊस शेती, फळबाग, भाजीपाला, भुसार वगैरे उत्पादने घेत असुन त्यांच्या शेती विषयक लागवड व उत्पादनास अधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळुन त्यांचे शेती व शेतीपुरक व्यवसाय उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने बाजार समितीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. इंदापूर कृषी प्रदर्शनास प्रवेश मोफत / विनामुल्य आहे. तसेच शेतमाल उत्पादनातील अग्रेसर प्रगतशील शेतकरी व नियमित शेतमाल खरेदी-विक्रीचे उत्कृष्ठ व उच्चांकी कामकाज करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणेकरीता त्यांचा यथोचीत सत्कार केला जाणार आहे.

इंदापूर बाजार समिती ही भुसार, मासे (मासळी), डाळींब, कांदा, पेरु, सिताफळ यासाठी प्रसिद्ध बाजारपेठ असुन समितीने शेतकऱ्यांसाठी अद्यावत सर्व सोयीयुक्त हक्काची बाजारपेठ उपलब्ध केलेली आहे. शिवाय मुख्य बाजार इंदापूर समितीने पेट्रोलपंप सुरु केलेला असुन उपबाजार निमगांव-केतकी व भिगवण येथे पेट्रोलपंप उभारणीचे नियोजन आहे. कृषी प्रदर्शनात नामांकित कंपनीचे शेती साधने, उत्पादने वगैरे शेती अनुशंगिक स्टॉल उभारणी युटिलिटी इन्हेंट चे रणजीत पांडे करणार आहेत. स्टॉल नोंदणीसाठी संपर्क शंकर शिंदे मो. ९०९६३५५५४१/ ७५६४९०९०९१ यांचेशी संपर्क करण्यात यावा.

इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजाराचे ठिकाणी नियमित शेतमाल खरेदी-विक्री कामकाज चालते. त्याकरीता बाजार समितीने बंदिस्त व सर्व सोयीयुक्त मार्केट उभारणी केलेली आहेत. त्यामुळे तालुक्यासह लगतचे तालुके-जिल्ह्यातुन शेतमाल विक्रीस येतो ही इंदापूर बाजार समितीची ख्याती आहे. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजार इंदापूर येथे आप्पासाहेब जगदाळे यांच्या संकल्पनेतुन व परिश्रमाने होत असल्याचं सभापती विलासराव माने यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहीत मोहोळकर, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, संचालक आमदार यशवंत माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, मनोहर ढुके,संदिप पाटील, रुपाली संतोष वाबळे, मंगल गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे व प्रभारी सचिव संतोष देवकर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow