गेल्या 48 तासापासून पोलीस नाईक निखिल रणदिवे बेपत्ता, कुटुंबाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ; पोलीस खात्याची चिंता वाढली
आय मिरर
पुण्याच्या यवत पोलीस ठाण्यामधील पोलीस नाईक निखिल रणदिवे 5 डिसेंबर पासून बेपत्ता आहे. 48 तास ओलांडले तरी निखिल रणदिवे याचा शोध लागलेला नाही.निखिल रणदिवे यांच्या शोधकामी चार पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान आता रणदिवे कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली आहे.
दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना सदर प्रकरणात वाचवत आहेत अशी तक्रारलेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निखिल रणदिवे यांनी केलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी व त्यांचा तपास हा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्त करण्यात यावा आणि सदर प्रकरणी दोषी असलेल्या पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निखिल रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली होती सुसाईड नोट...
4 डिसेंबर रोजी पोलीस नाईक निखिल रणदिवे याने वरिष्ठ अधिकारी बापूराव दडस यांना एक मेल पाठवला होता आणि या मेल द्वारे त्यांनी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आपल्याला एक वर्षापासून त्रास देत आहेत अशी तक्रार केली होती.त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आता आत्महत्या करीत आहे अशा आशयाची एक सुसाईड नोट देखील निखिल रणदिवे यांनी आपल्या तक्रारी अर्जासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना पाठवली आहे.
पोलीस खात्याकडून चार पोलीस पथके निखिल रणदिवे यांच्या शोधकामी रवाना करण्यात आली आहेत. मात्र 48 तास ओलांडले तरी देखील निखिल रणदिवे याचा शोध न लागल्याने कुटुंबीयांसोबत पोलीस खात्याची चिंता वाढली आहे.
दरम्यान काल शनिवारी सहा डिसेंबर रोजी निखिल रणदिवे यांच्या पत्नी मुलांना घेऊन अक्षदा रणदिवे यांनी थेट यवत पोलीस ठाणे गाठलं,आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांना माझा नवरा कुठे आहे असा जाबच विचारला.कोणत्याही परिस्थितीत आमचा माणूस आम्हाला हवा आहे अशी ठाम भूमिका मांडत, पोलीस खात्याकडून रणदिवे यांना कशा पद्धतीने वागणूक दिली जात होती याची कैफीयतच त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली.
यावर उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी पोलीस नाईक निखिल रणदिवे यांच्या शोधकामी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असून लवकरात लवकर त्यांचा तपास लावू त्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्या भागात पोलिसांची चार पथक आम्ही रवाना केली आहे त्यामुळे आपण काळजी करू नका असं आश्वासन अक्षदा रणदिवे यांना दिलं होतं.
यवत पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी त्यांच्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवलेली ही पोस्ट पहा,ही पोस्ट पाहिली तर रणदिवे हे प्रचंड तणावात होते याची स्पष्ट जाणीव होते.लाडक्या लेकीला उद्देशून भावनिक होऊन ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात,की
माझी प्रिय दिदी,आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्टांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पीटल मध्ये धेवुन जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली ०१ वर्ष पासुन सतत त्रास देत आहे. माझा नाई विलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझेकडुन दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा...केलेल्या कामाची पोच पावती आहे..भावपूर्ण श्रद्धांजली Niks
What's Your Reaction?