सुनेत्रा वहिनींचा रुद्रावतार ! एनसीपीच्या बैठकीत 'त्या' आमदाराला झाप झाप झापलं
आय मिरर
सोमवारी सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच पक्षातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीतील इनसाईड स्टोरी आता समोर आली असून विलिनीकरणाच्या चर्चांवरुन आमदार हिरामण खोसकर यांना चांगलंच झापल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे दुःख सावरुन सुनेत्रा पवार या कामाला लागल्या आहेत. त्यानंतर सोमवारी सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच पक्षातील आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी आपली पक्षाबद्दलची आणि कामकाजाची भूमिका सर्वांसमोर मांडली.
सुनेत्रा पवार यांनी आमदारांसोबत चर्चा केली तर काही महत्त्वाच्या विषयांवरुन थेट खरडपट्टी केल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. यावेळी सर्वांनी विनंती केली म्हणून मी पदाचा स्विकार करते. पक्षासमोर मोठी आव्हानं आहेत. सर्वांनी साथ द्या अशी भावनिक साद ही यावेळी सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना घातल्याची माहिती आहे.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन या बैठकीत वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.कोणीही विलिनीकरणावर सार्वजनिक मत मांडू नका, वैयक्तिक मत सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरेंकडे मांडा अशा सूचना पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी आग्रही भूमिका मांडली होती. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण शंभर टक्के झालं पाहिजे. नेत्याला खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर दोन तीन महिन्यांपासून सुरु असलेली विलिनीकरणाची चर्चा पूर्ण व्हावी, तसं झाले तर आम्हाला आनंद होईल, असं स्पष्ट मत खोसकर यांनी मांडले होते. याच मुद्द्यावरून या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार तसेच सुनील तटकरेंनी त्यांना चांगलेच झापल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
What's Your Reaction?