सीना आणि भीमा खोऱ्यातील पूरस्थितीची जयंत पाटील हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी
आय मिरर
एनडीआरएफच्या मर्यादेत राहून एवढीच मदत देता येते. असे सरकारने सांगू नये केंद्र आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफी करू. असे म्हणतात. हीच योग्य वेळ आहे. राज्यात कर्जमाफी जाहीर करावी. आणि बँकांना सांगून नवे कर्ज उपलब्ध करून द्यावे. दसरा पूर्वीच शेतकऱ्यांना मदत द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली.
माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी जयंत पाटील यांनी केली. प्रसंगी गाडी सोडून थेट ट्रॅक्टरमध्ये बसून जयंतराव पाटील यांनी शेतकऱ्याचा बांध गाठला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , आमदार अभिजीत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्याला आज एकरी किमान 50 हजार रुपये प्रमाणे मदत दिली पाहिजे. यामध्ये पंचवीस ते तीस हजाराचा पहिला हप्ता दसरापूर्वी देणे गरजेचे आहे. उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारने दिलासा दिला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी आपणास माहित आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ हा केवळ मराठीतील शब्द आहे. अशा दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल माझे भाष्य राखून ठेवतो. कारण मी बोललो तर ते राजकारण करतोय.असे बोलले जाईल असेही जयंत पाटील म्हणाले.
बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौरा करत असताना व नागरिकांशी संवाद साधताना तुझे लव्ह मॅरेज आहे का ? असा सवाल केला होता. यावरून पुरासारख्या व इतर परिस्थितीमध्ये प्रत्येकाने संवेदनशीलता पाळली पाहिजे. थट्टेचा विनोदाचा हा भाग नाही. लोकांसमोर होऊन लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत. असेही यावेळी पाटील म्हणाले.
What's Your Reaction?