दौंड मधील कला केंद्र पुन्हा चर्चेत ! एकावर कोयत्याने जीव घेणा हल्ला ; यवत पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Oct 15, 2025 - 21:51
Oct 15, 2025 - 22:02
 0  579
दौंड मधील कला केंद्र पुन्हा चर्चेत ! एकावर कोयत्याने जीव घेणा हल्ला ; यवत पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल

आय मिरर 

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्रामध्ये साहिल बापू जाधव याच्यावर कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. मंगळवारी 14 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्याजवळ माझ्याकडे रागात का पाहत होता असे असे म्हणत चौघा आरोपींनी साहिल जाधव यांच्यावर लोखंडी कोयत्याने डोक्यात, मानेवर आणि दोन्ही हातावर जीवे मारण्याचे उद्देशाने वार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये अदिनाथ उर्फ अदित्य ईश्वर गिरमे, रोहीत राजु भिसे या दोघांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.यातील गिरमे आणि भिसे हे दौंड तालुक्यातील पाटस येथील आहेत तर अन्य दोन अनोळखी हे दौंड तालुक्यातील वरवंड येथील आहेत.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,साहिल बापू जाधव हा दौंड तालुक्यात बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्रामध्ये मनोरंजनासाठी गेला होता आणि त्याच वेळी ज्यांनी हल्ला केला ते देखील त्याच ठिकाणी आले होते. तिथेच त्यांचा आमना सामना झाला आणि याच वेळी पाटस टोल नाक्यावर रागात का पाहिले याचा जाब विचारत आरोपींनी बापू जाधव याच्या वरती हल्ला केला यात तो जखमी झाला.

यापूर्वी देखील 21 जुलै च्या रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दौंड तालुक्यातील चौफुला वाखारी या ठिकाणी असलेल्या अंबिका कला केंद्रात भोरचे आमदार शंकर हिरामण मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब हिरामण मांडेकर यांच्यासह चौघांवर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी हे प्रकरण चांगले चर्चेत आले होते. 

त्यानंतर आता पुन्हा एकदा दौंड तालुक्यात बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्रामध्ये साहिल बापू जाधव याच्यावर कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow