विभागीय आयुक्तांकडून वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचाची पदावरून हकालपट्टी,वाचा काय आहे कारण...
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर ग्रामपंचायतीचे सरंपच संतोष ऊर्फ कुमार नामदेव गायकवाड यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याचा आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे.सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमताने ग्रामपंचायतीमध्ये गैरवर्तन तसेच कर्तव्यामध्ये कसूर करून अपहार केल्याची तक्रारी ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांच्यासह इतर दहा सदस्यांनी जिल्हापरिषदेकडे केली होती.
सरपंच गायकवाड हे नऊ फेब्रुवारी 2021 पासून ग्रामपंचायतीचे कामकाज पाहत असून त्यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांच्यासह इतर दहा सदस्यांनी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी 2021 ते 2024 काळात संगनमताने ग्रामपंचायतीमध्ये गैरवर्तन तसेच कर्तव्यामध्ये कसूर करून अपहार केला असल्याचा तक्रारी अर्ज 23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हापरिषदेकडे दाखल केला होता.
2024 हा हर्षवर्धन गायकवाड यांसह दहा सदस्यांचा सरपंच ऊर्फ कुमार नामदेव गायकवाड याविरुद्ध हा लढा सुरू होता.या तक्रारी अर्जानंतर पुणे जिल्हा परिषद कसून वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या कारभारची सखोल चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये सरपंच गायकवाड यांनी कामकाजात हलगर्जीपणा, दुर्लक्ष, आर्थिक व प्रशासकीय अनियमता, नियमबाह्य व बेकायदेशीर कामकाज करुन कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी विभागीय आयुक्तांना पाठवला होता.
सरपंच संतोष गायकवाड यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९ (१) नूसार कारवाई करण्यात यावी यासाठी हा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी विभागीय आयुक्तांना पाठवला,त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये याबाबत सुनावण्या सुरू होत्या.
३ डिसेंबर २०२५ रोजी विभागीय डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणात अंतिम सुनावणी देत संतोष ऊर्फ कुमार नामदेव गायकवाड यांच्यावर कारवाई करून सरपंच पदावरून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
What's Your Reaction?