रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापुरात आज रास्ता रोको

Jun 14, 2026 - 07:38
Jun 14, 2026 - 07:42
 0  400
रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापुरात आज रास्ता रोको

आय मिरर 

आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आज रविवारी दि.14 जून रोजी महाराष्ट्रातील पहिला रास्ता रोको केला जाणार आहे. कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात पुण्याच्या इंदापुरात हे आंदोलन केलं जाणार आहे.महाविकास आघाडी कडून हे आंदोलन केलं जाणार आहे. 

रोहित पवारांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांना समर्थन म्हणून महाविकास आघाडी कडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास पुणे शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर बस स्थानकाच्या समोर हा रास्ता रोको केला जाणार आहे.

अर्थात यामध्ये किती शेतकरी सहभाग घेतात हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी पुण्याच्या इंदापुरातून पडलेली ही आंदोलनाची ठिणगी याचा वनवा आता राज्यभर भडकतो की काय असा देखील अंदाज वर्तविला जातोय.

दरम्यान राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 30 जून पूर्वी हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असा दावा केलाय, एनडीटीव्हीशी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजे होणार असं म्हटलं आहे. यासोबतच आमदार रोहित पवार यांचं कर्जमाफी संदर्भात जे आंदोलन सुरू आहे ते त्यांनी मागे घ्यावं मुख्यमंत्र्यांशी बसून या संदर्भात चर्चेतून मार्ग काढला जाईल ज्या काही अटी शर्ती आहेत त्या शिथिल करण्यासाठी सरकार विचार करतंय असंही भरणे यांनी म्हटलं आहे.

मात्र जोपर्यंत सरकार कडून ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस पंढरपुरात आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील,शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे हजेरी लावणार आहेत.

आजच्या तिसऱ्या दिवशी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा फोनवरून आमदार रोहित पवारांशी चर्चा करतील. आमदार रोहित पवारांनी सरकारला आजचा अल्टिमेटम दिला आहे. आज सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर उद्या सकाळपासून संत नामदेव पायरीजवळ बसून आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow