बारामतीत पूर्व मोसमी पावसाचा पहिला बळी 11 शेळ्याही दगावल्या ; वाचा माळवाडीत काय घडलं

Jun 2, 2026 - 18:56
 0  269
बारामतीत पूर्व मोसमी पावसाचा पहिला बळी 11 शेळ्याही दगावल्या ; वाचा माळवाडीत काय घडलं

आय मिरर 

बारामती तालुक्यात रविवारी झालेल्या पूर्व मोसंबी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं यानंतर आज झालेल्या पूर्व मौसमी पावसानं एका 62 वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. बारामती तालुक्यातील माळवाडी गावात ही घटना घडली आहे. 

बारामती तालुक्यातील माळवाडी गावातील नंदा जनार्धन लडकत या 62 वर्षीय महिलेचा यात मृत्यू झाला असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. तर याच दुर्घटनेत 11 शेळ्यांचा देखील मृत्यू झाला आहे.

माळवाडी येथे झालेल्या अवकाळी वादळ व पावसामुळे जुन्या बंद हॉटेल चे भिंत व पत्रा शेड पडून एक वृध्द महिला नंदाबाई जनार्दन लडकत यांचा अपघाती मृत्यू झाला असून 11 मेंढ्या व शेळ्या मृत्यू मुखी पडल्या आहेत. प्रशासनाकडून या बाबत पंचनामा करण्याचं काम चालू आहे.

अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा फटका बसू नये यासाठी दोन महिला एका पत्र्याच्या शेडमध्ये आश्रयासाठी गेल्या होत्या, याच वेळी या पत्रा शेडची भिंत अंगावर कोसळल्याने त्या भिंतीखाली सापडून नंदा लडकत या महिलेचा मृत्यू झाला.असून 11 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow