शेजाऱ्याने असं काय सांगितलं की बाप हैवान बनला? एकीचा मृत्यू एक बेशुद्ध

Mar 27, 2026 - 13:42
Mar 27, 2026 - 13:55
 0  973
शेजाऱ्याने असं काय सांगितलं की बाप हैवान बनला? एकीचा मृत्यू एक बेशुद्ध

आय मिरर 

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका बापाने क्रौर्याची परिसीमा गाठत आपला मुलीचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पोटच्या मुलींच्या वर चोरीचा आळ घेतल्याने संतापलेल्या बापाने पोटच्या दोन मुलींना रात्रभर घराच्या छताला उलटे लटकवल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे.

या क्रूर घटनेत रात्रभर उलटे लटकवल्याने तडफडून सारिका यमगर या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी अनुजा यमगर हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यमगर कुटुंबीय आटपाडीच्या बनपुरी येथे वास्तव्यास आहे. सारिका आणि अनुजा या दोन मुलींवर यमगर कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने चोरीचा आळ घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या दादू हैबत यमगर या मुलींच्या बापाने दोन्ही मुलींना अमानुष मारहाण केली. त्यानंतर घराच्या छताला असणाऱ्या अँगलला दोघींनाही रात्रभर उलटे लटकवून ठेवले.

दोन्ही मुली पिण्यासाठी पाणी मागत असतानाही दादू यमगर या बापाने मुलींना पिण्यासाठी पाणी दिले नाही. यामुळे रात्रभर तडफडलेली सारिका ही सकाळी मृत अवस्थेत तर अनुजा ही बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. त्यामुळे अनुजा हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धक्कादायक बाब म्हणजे सारिका हिचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येताच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न यमगर कुटुंबाकडून करण्यात आला. परंतु रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या अनुजा हिला याचवेळी जाग आली आणि तिने घडला प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाला सांगितला.

दरम्यान, रुग्णालयाकडून तातडीने आटपाडी पोलिसांना याची कल्पना दिल्यानंतर या सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. केवळ चोरीच्या संशयातून निर्दयी बापानेच उलटे लटकवल्याने तसेच मारहाण केल्याने या मारहाणीत सारिका हिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीये. दरम्यान याप्रकरणी दादू यमगर याला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow