इंदापुरात खडकवासल्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्याचे भर उन्हात आमरण उपोषण

Jun 2, 2026 - 19:07
Jun 2, 2026 - 19:09
 0  220
इंदापुरात खडकवासल्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्याचे भर उन्हात आमरण उपोषण

आय मिरर 

पुण्याच्या इंदापुरात कळस गावात भगवान खारतोडे या शेतकऱ्याने खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्यासाठी विविध मागण्या घेऊन भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले आहे.

खडकवासला उजव्या कालव्याचं 12 मे रोजी सुरू करण्यात आलेलं पाण्याचा आवर्तन हे टेल पर्यंत पोहोचलं नाही याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं याशिवाय खडकवासल्याच्या पाण्याअभावी जळालेल्या उसाचे त्वरित पंचनामे करून एकरी 50 हजार रुपये भरपाई मिळावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

यासोबतच तरंगवाडी, नाव्ही,कौठळी, रुई कळस,अकोले, निरगुडे, पिंपळे,शेटफळगडे या गावांच्या वॉटर सप्लाय विहिरी खडकवासला कालवा पाण्याने भरून द्याव्यात यासह इतर मागण्या घेऊन हे उपोषण सुरू करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow