जरांगे पाटलांना समर्थन दर्शवण्यासाठी गेलेल्या मराठा सेवकांच्या कारला बीडमध्ये अपघात " रामचंद्र जमदाडेंच्या अपघाती मृत्यूने इंदापूर तालुका हळहळला" शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार

May 31, 2026 - 17:27
May 31, 2026 - 17:40
 0  281
जरांगे पाटलांना समर्थन दर्शवण्यासाठी गेलेल्या मराठा सेवकांच्या कारला बीडमध्ये अपघात " रामचंद्र जमदाडेंच्या अपघाती मृत्यूने इंदापूर तालुका हळहळला" शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार

आय मिरर

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गेलेल्या इंदापूर तालुक्यातील मराठा सेवकांच्या गाडीला बीडच्या मांजरसुंबा घाटात अपघात झाला यात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील रामचंद्र शंकर जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर संतोष पांडुरंग माने आणि बिपिन नारायण मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. 

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न कोणत्याही आंदोलनात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या रामचंद्र जमदाडे यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सरडेवाडी गावासह इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली असून रामचंद्र जमदाडे यांच्यावर आज रविवारी (दि.३१ मे) रोजी सरडेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,बाजार समितीचे सभापती संदीप पाटील,कर्मयोगीचे संचालक रवींद्र सरडे,माजी संचालक वामनराव सरडे यांसह सरडेवाडी गावाचे ग्रामस्थ,विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि मराठा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी रामचंद्र जमदाडे, बिपिन मोरे आणि संतोष माने हे स्विफ्ट कारमधून अंतरवाली सराटी येथे गेले होते. जरांगे पाटील यांच आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर हे मराठा सेवक परतीचा प्रवास करत होते. याचवेळी मांजरसुंबा घाट ओलांडून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर पुढे आल्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. 

हा अपघात इतका भीषण होता की यात कारमधील रामचंद्र शंकर जमदाडे वय 43 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्वर्गीय रामचंद्र जमदाडे यांच्या पाश्चात्य पत्नी एक मुलगा,दोन विवाहित मुली, वडील शंकर जमदाडे आणि एक विवाहित बंधू आणि त्यांच कुटुंब असा परिवार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow