पुणे पिंपरी चिंचवड मध्ये 25 हून अधिक बळी गेले तरीही पुरंदर मध्ये गावठी हातभट्टीची खुलेआम विक्री ?
आय मिरर
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मागील काही दिवसापूर्वी गावठी हातभट्टी विषारी दारू नये अनेकांचे बळी घेतले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्याच्या पुरंदर तालुक्यात मात्र गावठी हातभट्टी दारूची खुली आम विक्री होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होतोय.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवरी गावाजवळील कडजाई धरण परिसरात गावठी हातभट्टी दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता जेजुरी पोलीस यावर कारवाई करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गावठी हातभट्टीने अनेकांचे बळी घेतले यामुळे एकच खळबळ उडाली होती. अशा परिस्थितीत एवढी मोठी गंभीर घटना असताना देखील पुरंदर तालुक्यातील शिवरी गावाजवळील कडजाई धरण परिसरात मात्र गावठी हातभट्टीची खुल्या विक्री होत असल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे.
ज्यावेळी याची गावातील काहींना कुणकुण लागली तेव्हा गावातील सुशिक्षित नागरिकांनी या ठिकाणी जाऊन या गावठी हातभट्टी दारू विक्रीला मज्जाम केला याचा व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला.
जेजुरी पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने छापेमारी करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.
What's Your Reaction?