प्रेमप्रकरणातून पुण्यातील 'त्या' हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या
आय मिरर
पुण्यातील एका हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्यापाऱ्याची हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
या हत्येप्रकरणी कोलकत्ता येथे राहणाऱ्या एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. संदीप कांबळे असे मृत हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील शास्त्रीनगर येथील ते रहिवाशी आहेत. विकास कुमार शॉ आणि अंजली शॉ अशी आरोपींची नावे आहेत.आरोपींनी आपणच खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
व्यवसायाच्या निमित्ताने संदीप कांबळे हे देशभर फिरत असतात. मागील वर्षी 2023 मध्ये ते कोलकाता येथे गेले असताना त्यांची भेट अंजली शॉ हिच्याबरोबर झाली होती. दोघांनीही एकमेकांचा नंबर मिळवला. त्यानंतर दोघांमधील बोलणे भेटणे वाढले. पुणे, कोलकत्ता येथे त्यांच्यात भेटीही झाल्या. संदीप कांबळे हा विवाहित होता. मात्र तरीही त्याने अंजलीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तिने त्यास नकार दिला. तिने नकार दिल्याने संदीप प्रचंड चिडला. त्यानंतर अंजलीने त्याच्यासोबत भेटणे व बोलणेही टाळले. त्यानंतर संदीपचा राग अनावर झाला. त्याने अंजलीसोबतचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
संदीपने अंजलीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. तो सतत तिला प्रियकरापासून वेगळं होण्यासही सांगत होता. संदीपच्या रोजच्या त्रासला वैतागून अंजली आणि तिच्या प्रियकराने त्याला संपवण्याचा कट रचला. ब्लॅकमेलिंगला कंटाळून आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासोबत संदीपला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले होते. त्याला भेटून कसही करुन त्याच्याकडून मोबाइल हिसकावून घेण्याचा प्लान त्यांनी रचला. सोमवारी आरोपी महिला संदीप कांबळेला गुवाहाटीच्या विमानतळावर भेटली त्यानंतर ती त्याच्यासह रेडिसन ब्लू हॉटेलला रवाना झाली. जिथे त्यांनी चेक-इन केले. महिलेचा 23 वर्षीय प्रियकरदेखील या हॉटेलमध्येच थांबला होता. साधारण दोन वाजण्याच्या सुमारास महिलेचा प्रियकर त्यांच्या खोलीत दाखल झाला आणि दोघांमध्ये मोठा वाद झाला. याच वादातून संदीपची हत्या करण्यात आली. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला मात्र त्यांना विमानतळावर अटक करण्यात आली.
What's Your Reaction?