Big Breaking | Sharad Mohol | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Jan 5, 2024 - 16:55
 0  1520
Big Breaking | Sharad Mohol | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

आय मिरर

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.परंतु गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. शरद मोहोळ याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

काही महिन्यापूर्वीच शरद मोहोळ याची पत्नी हिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शरद मोहोळ ही अनेक हिंदुत्ववादी संघटनाच्या व्यासपिठावर उघडपणे वावरत होता. आज त्याच्या लग्नाचाही वाढदिवस होता. दुपारी सुतारदरा येथील राहत्या घरून तो दुचाकीवरून बाहेर पडला तेव्हा चार हल्लेखोरानी त्याला घेरून जबरदस्त गोळीबार केला. यातल्या तीन ते चार गोळ्या मोहोळ याला लागल्या होत्या. त्याच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

कोण आहे शरद मोहोळ

पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून मोहोळची ओळख आहे.शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचा अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. मोहोळ आणि आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याने दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता. मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव या दोघांनी 2012 मध्ये कातील सिद्दीकीचा येरवडा जेलमध्ये खून केल्याचा आरोप आहे. या खटल्यातून त्याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर शरद मोहोळवर याशिवाय मोक्का अनव्यये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow