बारामतीच्या जागेवरून हर्षवर्धन पाटलांनी अजितदादांना डिवचलं ! तर इंदापूर विधानसभेची ही कोणी चिंता करू नये

Feb 7, 2024 - 17:19
Feb 7, 2024 - 17:21
 0  3810
बारामतीच्या जागेवरून हर्षवर्धन पाटलांनी अजितदादांना डिवचलं ! तर इंदापूर विधानसभेची ही कोणी चिंता करू नये

आय मिरर

तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागत होती, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर तशीच शांत झोप लागतेय का? असा प्रश्न भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांना पत्रकारांनी विचारल्यावर, माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.शिवाय बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाचा चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना डिवचले आहे. त्यामुळे यावरून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवली जातीय.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडेच देण्याचा मोठा निकाल दिला. पण या निर्णयामुळे माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी देत अजित पवार महायुतीत आले असले तरी इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असं सूचक विधानही हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीत फुट पडली आणि शरद पवार, अजित पवार असे दोन गट झाले. बारामती ही सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ आहे. त्या शरद पवारांसोबत आहेत. बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटलांनीही तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. आता अजित पवार भाजपासोबत असल्याने तो मतदारसंघ कोणाला जाणार अशीही चर्चा रंगली आहे.  

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर आणि अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्या ठिकाणचा खासदार निवडून आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष देऊन गाठीभेटी घ्यायला सुरू केल्या.बारामती मतदारसंघाचे नेतृत्व सध्या सुप्रिया सुळे करत असून त्याच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे. 

अंकिता पाटलांच्या नावाचीही चर्चा

बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटलांनीही तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी हा मतदारसंघ कुणाला मिळणार यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचं सांगत आता अजित पवारांना डिवचल्याची चर्चा आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow