पुण्याच चाललंय काय? पुन्हा कोयता गँगची दहशत !

Sep 7, 2023 - 07:53
 0  300
पुण्याच चाललंय काय? पुन्हा कोयता गँगची दहशत !

आय मिरर

शिक्षणाचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात आला गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे. गेल्या एका वर्षात कोयता गँगची दहशत वाढल्याने आता पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आता आला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातील टिळक रोडवर हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. MPSC करणाऱ्या तीन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

पुणे शहरातील मध्यावतीत असलेल्या टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार झाले. आज रात्री 2 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आलीये. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पानमळा परिसरातून अटकसत्र सुरू केलं. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना खाक्या दाखवल्या आहेत. आदित्य उर्फ आदी जीवन गायकवाड, साहिल उर्फ ब्लॅकी शंकर वाघमारे आणि अनिकेत उर्फ ऑन्डी संग्राम सरोदे असं या आरोपीचं नाव आहे.

एमपीएससी करणारे तरूण खजिना वीर परिसरातून रात्री उशिरा लायब्ररीमधून घरी जात ही घटना घडली. शक्ती स्पोर्ट्ससमोर आरोपी पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिवावर आले. त्यांनी तरुणांची कॉलर पकडून धमकी देऊ लागले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कोयता मारण्याचा देखील प्रयत्न केला गेला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तरुणांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी कारवाई केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow