गृहमंत्री महोदय,आता तरी जागे व्हा ! इंदापूरात तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्यावरुन सुळेंनी फडणवीसांना सुनावलं 

May 24, 2024 - 16:46
May 24, 2024 - 16:48
 0  217
गृहमंत्री महोदय,आता तरी जागे व्हा ! इंदापूरात तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्यावरुन सुळेंनी फडणवीसांना सुनावलं 

आय मिरर

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खा.सुप्रिया सुळे यांनी निषेध नोंदवला आहे.तहसीलदार श्रीकांत पाटील यांवर झालेला अज्ञातांचा हल्ला ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना असल्याचं म्हणत गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे अशा तिखट शब्दात सुळे यांनी राज्यसरकारवर हल्ला चढवला आहे.

सुळेंच्या पोस्ट मध्ये काय…

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे.

गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow