फक्त चहा पिण्यासाठी गेले आणि तेवढ्यातचं सर्व काही घडलं ; इंदापूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा 

Sep 7, 2023 - 13:33
 0  4039
फक्त चहा पिण्यासाठी गेले आणि तेवढ्यातचं सर्व काही घडलं ; इंदापूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा 

आय मिरर

चहाच्या सेंटरवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका व्यक्तीच्या गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल १ लाख रुपये चोरून नेल्याची धक्कादायक घटना इंदापूर शहरात घडलीय. मंगळवारी दि.५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून या संदर्भात दिलीप नारायण सावंत रा. खोराची, ता. इंदापूर, जि. पुणे यांनी अज्ञात चोरट्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी इंदापूर अर्बन बँकेतून पैसे काढले.त्यानंतर ते इंदापूर प्रशासकीय भवना शेजारील नगरपरिषदेच्या गाळ्यातील एका चहा च्या स्टाॅलवर चहा पिण्यासाठी थांबले. यावेळी सावंत यांनी बँकेतून काढलेली एक लाख रुपये कॅश त्यांच्या स्विफ्ट कार क्रमांक MH 45 AL 9053 च्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती.दरम्यान चहा पिऊन परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या कारची पुढील डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली. सावंत यांनी पैसे ठेवलेले ते ड्रॉवर ही त्यांना उघडे दिसले तर त्यातील रक्कम ही त्या ठिकाणी नव्हती. इंदापूर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow