Big Breaking पैसे चोरल्याचा आरोप ! लाथाबुक्क्यांनी गुप्तांगावर मारहाण,मारहाणीत कामगाराचा मृत्यू - पुण्यातील धक्कादायक प्रकार

आय मिरर
पैसे चोरल्याच्या आरोपावरून गुप्तांगावर लाथ मारल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव येथील जाधवनगर परिसरात घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
संदीप राजाराम पाटील (वय ५६, रा. महादेवनगर, वडगाव) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी प्रसद गोपाळ कारेकर (वय ३७, रा. जाधवनगर, वडगाव) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कारेकर याची टपरी असून, तो चोरून दारू विक्री करीत होता. त्याला यापूर्वी शहरातून तडीपार करण्यात आले होते.
परंतु नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर (गुन्हे) करीत आहेत.
What's Your Reaction?






