ब्रेकिंग | पुणे पंढरपूर मार्गावर नीरा नजीक ट्रक आणि डंपरचा अपघात

Mar 18, 2025 - 22:01
Mar 18, 2025 - 22:02
 0  485
ब्रेकिंग | पुणे पंढरपूर मार्गावर नीरा नजीक ट्रक आणि डंपरचा अपघात

आय मिरर (राहुल शिंदे)

पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर नीरा नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रक आणि डंपर यांच्यामध्ये समोरासमोर धडक झालीय. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले असून संतोष चव्हाण व संजय बनसोडे अशी त्यांची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर नीरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हे बाजूकडून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन निघालेला ट्रक क्रमांक MH 11 M 4911 व नीरा बाजूकडून वाल्हेच्या दिशेने निघालेला डंपर क्रमांक MH 14 Dm 6376 यांच्यामध्ये ही धडक झाली. 

अपघातानंतर नीरा पोलीस चौकीतील पोलीस हवालदार हरिश्चंद्र करे आणि होमगार्ड संतोष वाल्हेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले व वाहतूक सुरळीत केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow