इंदापुरात काळेवाडी नजीक पिकअप ला अपघात, सहा जण गंभीर तर सात किरकोळ जखमी

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मधून मोठी बातमी आहे.पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर 1 येथे ह्युडाई कंपनीच्या कार ला पाठीमागून धडक दिल्याने पिक अप आणि हुंडाई कारचा अपघात झाला आहे.यात 13 प्रवासी जखमी झाले असून हे सर्व प्रवासी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा मधील आहेत.
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील वेताळ बाबाच्या यात्रेकरीता हे लोक लाईट डेकोरेशनच्या कामाकरिता निघाले असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत असून सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर काळेवाडी नंबर एक नजीक हा अपघात झाला आहे.
या अपघातामध्ये पिक अप गाडी रस्ता दुभाजक तोडून बाजूला फरफटत गेली. यावेळी पिक अप मधील सुमारे 13 लोक रस्त्यावर जखमी होऊन पडले. यातील 6 लोक गंभीर जखमी आहेत.
अपघात समजताच स्थानिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ बचावकार्य करीत चार रुग्णवाहिका मधून जखमींना उपचार कामी रुग्णालयात पाठवले आहे.अपघात समजताच घटनास्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्र इंदापूरचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, साहेब पोलीस उपनिरीक्षक काळे,जगदाळे, पोलीस हवालदार अर्जुन, जगताप, पोलीस कॉन्स्टेबल लोंढे यांनी भेट दिली.
महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास काळेवाडी नंबर एक नजीक पिकअप क्रमांक MH 42 M 4616 वरील चालक शरद चव्हाण वय 33 वर्षे राहणार कानगाव ता. दौंड जि. पुणे हा पुणे बाजू कडून सोलापूर बाजूकडे निघाला होता.
यावेळी हुंडाई आय ट्वेन्टी कार क्रमांक MH 42 K 8686 ला धडक बसून मध्यभागी असलेल्या दुभाजकाला क्रॉस करून पिक अप पलटी झाल्याने अपघात झाला.
यात पिक अप मधील प्रवासी 1) गणेश विलास थोरात वय 22 वर्ष 2) नदीफ रफिक सय्यद वय 24 वर्ष 3) स्वप्निल महादेव जाधव वय 20 वर्ष 4)ओंकार जयनेंद्र पवार वय 20 वर्ष 5) कुणाल राजू चव्हाण वय 15 वर्ष 6)अविनाश विजय जाधव वय 16 वर्ष एक गंभीर जखमी झाले आहेत.
तर 1)आदित्य दत्तात्रय भिसे वय 20 वर्षे 2) गोरूनाथ बसू राठोड वय 18 वर्षे 3) प्रवीण चव्हाण वय 22 वर्षे 4) शिवा आबा शिंदे वय 20 वर्षे 5) अभिषेक लक्ष्मण धोत्रे वय 23 वर्षे 6) राकेश प्रमोद कुमार रामे वय 15 वर्षे व पिक अप चालक शरद बाळासो चव्हाण वय 33 वर्षे एक किरकोळ जखमी झाले असून वरील सर्व प्रवासी मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील आहेत.
What's Your Reaction?






