नाव ऐकताच जिथे अधिकाऱ्यांना घाम फुटतो,त्याच अजितदादांच्या बारामतीत या पट्ट्याने एक लाखाची लाच मागितली अन्...

आय मिरर
बारामतीतील नगर परिषदेचा नगर रचनाकार विकास ढेकळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. बारामतीतील एका बांधकाम व्यवसायिकाने विकास ढेकळे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार असलेल्या बांधकाम व्यवसायिकाला विकास ढेकळे याने पावणे दोन लाखाची मागणी केली होती.यातील एक लाख रुपये लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ढेकळे याला रंगेहात पकडला आहे.
या संदर्भातील पुढील कारवाई सुरू आहे. लाच घेण्यात फक्त ढेकळे यांचाच सहभाग होता की ढेकळे अन्य कुणाला यातील वाटा देत होते याचा देखील शोध घ्यायला पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रशासनावरती उत्तम पकड असणारा नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अवघा महाराष्ट्र पाहतो मात्र त्यांच्याच बारामती शहरातील नगर परिषदेचा कर्मचारी एवढं मोठं धाडस करतो आणि बांधकाम व्यवसायकांना लाखो रुपयांची लाच मागतो हे पाहून मात्र आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विशेष म्हणजे हा सापळा बारामतीतील एका जिम मध्ये लावण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. व्यायामाचे निमित्त करून त्याने याठिकाणहून एक लाख रुपयांची लाच स्वीकारली याच वेळी तो रंगेहाथ सापडला. गेल्या अनेक महिन्यांपासून या अधिकाऱ्याच्या लाचखोरीची चर्चा बारामतीत होती. व्यवसायिकांची तो प्रचंड लूट करीत होता अशी कुजबुज आता बाहेर पडू लागली आहे.
What's Your Reaction?






